Pune: राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन हे सरसकट मराठ्यांना आरक्षणाचं आहे, की फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्याचं यावरून राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांमध्ये तफावत आहे. जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यांचा दौराही सुरू आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे कामही सुरू आहे. या समितीतील नेत्यांना जरांगे आज फोन करून आरक्षणाचं काय झालं, असा सवाल करणार आहेत. आळंदीत ते माध्यमांशी बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण काल (रविवार) दिवसभर नेत्यांना फोन लावत होतो. मात्र, कुणाशीही संपर्क झाला नाही. आज (सोमवार) पुन्हा सरकारच्या समितीतील नेत्यांना फोन लावून आरक्षणाचं काय झालं विचारणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.
जरागेंची आज कल्याण आणि पुण्यातील खराडीत सभा आहे. सभेसाठी सकल मराठा समाजाने जोरदार तयारी केली आहे. रविवारी मध्यरात्री त्यांची देहूत सभा झाला. सभेत त्यांनी छगन भुजबळांचा जोरदार समाचार घेतला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.
मराठा समाज ओबीसीत असेल आणि आम्हाला रोखू नका. ही गोरगरिबांच्या लेकरं सर्व निकष पूर्ण करीत आहेत, तरी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण घेऊ देत नसाल तर तुमची ही कुठली भूमिका? असं म्हणत जरांगे पाटलांना वडेट्टीवारांना थेट सवाल केला आहे. कुणी कितीही ताकद लावली तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. म्हटलं म्हातारा माणूस आहे म्हणून मी काही बोलत नाही, पण मराठा आरक्षणाला विरोध केला, तर मग मात्र काय खरं नाही," असे म्हणत जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.