Manoj Jarange Patil Protest : जरांगेच्या आंदोलनासाठीची मुदत संपण्यास काही मिनिटेच उरली; सदावर्तेंची पोलिसांत धाव…

Manoj Jarange Patil’s protest deadline nearing end : नवीन कायद्याप्रमाणे जरांगे यांना सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची वेळ आहे. जरांगे यांच्याकडून सरकार, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री, कायद्याला चॅलेंज दिले जात आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
Gunaratna Sadavarte, Manoj Jarange Patil
Gunaratna Sadavarte, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Gunratna Sadavarte files complaint with police : मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक दिवसाचीच मुदत दिली आहे. ही मुदत सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यासाठी आता काही मिनिटांचाच कालावधी उरला असून त्याआधीच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करावा, त्यांना सहा वाजल्यानंतर आझाद मैदानातून हटवावे, अशी तक्रार सदावर्तेंनी केली आहे.

सदावर्ते यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. गल्लीतल्या राजकारणासाठी जरांगे नावाच विचार उभा केला असून त्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, मुंबईची बदनामी व्हावी, या उद्देशाने सीएसटी स्टेशनजवळ रास्ता रोको करण्यात येत होता. अनागोंदी दिसावी, काहीतरी अघटित घडावे, हे सगळं कुभांड आहे. त्यामुळे तातडीने कारवाई व्हायला हवी.

हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगे यांचा फक्त मुखवटा आहे. राजकारण हे या आंदोलनाचा आत्मा असल्याचे आज सिध्द झाले आहे. उद्धव ठाकरेंची मुक संमती हे लक्षात आणून देत आहे की, त्यांचा यात किती सहभाग आहे. शरद पवारांच्या गटाचे खासदार त्यांच्यासोबत आहेत. गल्लीतच्या राजकारणासाठी जरांगे नावाचा विचार उभा केला आहे, असे सदावर्ते म्हणाले आहेत.

Gunaratna Sadavarte, Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis On Manoj Jarange: जरांगे यांच्या आंदोलनावर सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर, संविधानात्मक मार्ग...'

नवीन कायद्याप्रमाणे जरांगे यांना सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची वेळ आहे. जरांगे यांच्याकडून सरकार, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री, कायद्याला चॅलेंज दिले जात आहे. असंस्कृत वर्तन, वेठीस धरण्याचे कृत हे जाणीवपूर्वक केले जात आहे. म्हणून आम्ही तक्रार केली असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.

आज टॅक्सी सेवा बंद आहे. स्टेशनरीच्या दुकानांवर परिणाम झाला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिक, इतर कामगार, कष्टकऱ्यांवर परिणाम झाला आहे. अनेक पुल, रस्ते बंद आहेत. रस्ते जाम करण्यात आले आहेत. पाच हजारची मर्यादा ओलांडली आहे. मंत्रालयाजवळ हुल्लडबाजी सुरू आहे. त्यामुळे जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दिल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.

Gunaratna Sadavarte, Manoj Jarange Patil
Rajabhau Waje : 'गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनास पाठिंबा' खासदार वाजेंनी जाहीर करुन टाकलं..

पोलिसांच्या अटींचे आणि कायद्याचे उल्लंघन जरांगेंनी केले आहे. त्याचप्रमाणे खासदार बजरंग सोनवणे, खासदार संजय जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करावी, अशी तक्रार सदावर्ते यांनी केली आहे. जरांगे यांनी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा भंग केला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास देण्याचे कुंभाड रचण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर त्यांना आझाद मैदानात बसू देऊ नये, असे सदावर्ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com