Maratha Reservation : ...जेव्हा केसरकर जरांगेंना 'आदरणीय पाटीलजी' म्हणतात!

Maratha Reservation Morcha News : मनोज जरांगेचा प्रभाव पाहता आता मंत्रीही मनोज जरांगेंचा आदरार्थी उल्लेख करत आहेत..
Manoj Jarange Speech on Maratha Reservation
Manoj Jarange Speech on Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : जालन्यातील अंतरवाली सराटीहून निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आक्षणासाठीचा महाविराट मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर वाशीमध्ये आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आजचा दिवस निर्णायक असणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन जवळपास एक तास त्यांच्याशी चर्चा केली. आता यावर मनोज जरांगेंनी आपली सविस्तर भूमिका दुपारी दोन वाजता स्पष्ट करणार आहेत.

Manoj Jarange Speech on Maratha Reservation
Maratha Reservation Mumbai Protest Navi Mumbai : नवी मुंबई बाजार समिती मराठा आंदोलकांसाठी खुली, भोजनाची व्यवस्था...

दरम्यान, राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगेंचा उल्लेख आदरणीय पाटीलजी असा केला. केसरकर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतच्या आदरणीय पाटीलजी यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची गरज उरणार नाही, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Speech on Maratha Reservation
Maratha Reservation Survey Video : मराठा सर्वेक्षणच्या प्रगणकांच्या नेमणुकीची पोलखोल, रोहित पवारांनी 'तो' व्हिडीओ केला शेअर

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे यांनी मागील काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. समाजाप्रती त्यांची समर्पणाची भावना, त्याग आणि समाजासाठी झोकून देण्याचं सातत्य यामुळे मराठा समाज बांधवांनी त्यांचे नेतृत्व एकमुखाने मान्य केले. मराठा समाजाला एकवटण्यात मनोज जरांगे यशस्वी झाले आहेत. त्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. महिला, पुरुष सगळेच उत्स्फुर्तपणे तहानभूक विसरून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुंबईच्या दिशेना पदयात्रा काढत आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे चित्र दिसते आहे. यामुळे आता त्यांचा प्रभाव इतका वाढला आहे की, सरकारचे प्रतिनिधीही त्यांचा उल्लेख 'आदरणीय पाटीलजी' असा करू लागले आहेत. सरकारी मंत्र्यांच्या बोलण्यातील, देहबोलीतील हा फरक बरंच काही सांगून जाणारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com