Maratha Reservation Mumbai Protest Navi Mumbai : नवी मुंबई बाजार समिती मराठा आंदोलकांसाठी खुली, भोजनाची व्यवस्था...

Manoj Jarange patil : मार्केट मधील 289 गाळे मराठा आंदोलकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
manoj jarange, shashikant shinde
manoj jarange, shashikant shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ राज्याच्या राजधानीकडे निघाले असून मुंबईच्या वेशीवर धडकले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पदयात्रेत सहभागी झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या या लढ्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शशिकांत शिंदे यांनी मराठ्यांच्या विराट पदयात्रेतील मराठा बांधवांची नवी मुंबईमध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती खुली केली आहे.

manoj jarange, shashikant shinde
Manoj Jarange Patil Morcha: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; जरांगे पाटील अन् शिष्टमंडळाची उद्या बैठक

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, हा निर्धार करून मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या नेतृत्वातील मराठ्यांचा विराट मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे. यासाठी नवी मुंबईत मराठा मोर्चाच्या मुक्कामाची सोय केली जाणार आहे. यासाठी बाजार समितीचे कामगार संचालक आणि आमदार शशिकांत शिंदे ( shashikant shinde) यांनी नवी मुंबई बाजार समिती अंतर्गत असलेले धान्य मार्केट, मसाला मार्केट,मधील काही भाग आंदोलकाच्या विश्रांतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. Maratha Reservation Mumbai Protest Navi Mumbai

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मार्केट मधील 289 गाळे मराठा आंदोलकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मराठा मोर्चेकऱ्यांना याच ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून मार्केट स्वच्छ करून घेण्यात आले आहे. या ठिकाणी आंदोलकांना राहण्याची, जेवणाची, नाश्ता, अंघोळ, शौचालये साफसफाई, पार्किंग व्यवस्था, करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठा मोर्चातील मराठा बांधवांची संख्या लाखोंच्या घरात आहे. याचा विचार करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व वाहने बाहेर काढून त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मराठा पदयात्रा मार्केट परिसरात दाखल झाल्यानंतर या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी बहुतांश रोड ब्लॉक करण्यात येणार आहेत. तसेच मसाला मार्केट, एपीएमसी या ठिकाणी या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठा आंदोलकांची योग्य पद्धतीने सोय केली जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

धान्य मार्केटमध्ये जाहीर सभा

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील धान्य मार्केटमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल या हेतून पूर्व तयारी करण्यात आली आह. मात्र, या सभेबाबत मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील. तसेच शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील मनोज जरांगे पाटील सभेला संबोधित करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

दोन दिवसासाठी बाजारपेठ बंद

नवी मुंबई बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा पदयात्रा मुंबईत दाखल होत आहे. त्यांच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समितीतमधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाजार समिती दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मराठा आंदोलकांना राहण्यासाठी स्वत:चे गाळे उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

manoj jarange, shashikant shinde
Loksabha Election 2024 : महायुती नवीन चेहऱ्याच्या शोधात, विद्यमान खासदारांचाही दावा कायम !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com