Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Maratha Morcha : Sarkarnama

Manoj Jarange Mumbai Morcha : मागण्या मान्य, मनोज जरांगेंच्या विजयी सभेला मुख्यमंत्री निघाले...

Maratha Aarakshan Mumbai Morcha : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले.
Published on

Mumbai : मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सुधारीत जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांना देणार आहेत. वाशी येथे जाहीर सभेत हा जीआर मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत.

Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange on Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे जिंकले; सरकारकडून सर्व मागण्या मान्य; गुलाल उधळणार...

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले. त्यामुळे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shind)आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे. Manoj Jarange Mumbai Morcha

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश काढला. तो अध्यादेश जरांगे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. मनोज जरांगेंसोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com