Maratha Reservation Protest : मराठा आंदोलन आणखी तिखट होणार? जरांगेंनी बाह्या सरसावल्या, आझाद मैदानावर महत्वाची घडामोड

Manoj Jarange Patil, Maratha reservation : मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेलं मुंबईतील आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसच आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज सोमवार (ता. १) चौथा दिवस आहे. अद्याप तोडगा न निघाल्याने हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. आजपासून जरांगे पाटील यांनी पाणी पिणं देखील सोडलं आहे.

सुरुवातीला या आंदोलनासाठी केवळ एक दिवसाची परवानगी मिळाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या व तिसऱ्या दिवसासाठी परवानगी मिळाली. पण आज सोमवार चौथ्या दिवशीही जरांगेंचे उपोषण सुरुच आहे. आता हे आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्याला कारणही तसेच आहे.

मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलन स्थळी मोठा स्टेज उभारण्याचे काम सुरू आहे. तब्बल पाच हजार लोकांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचं काम मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पावसापासून आंदोलकांचा बचाव व्हावा यासाठी मराठा बांधवांनी हे काम सुरु केलं आहे.

आंदोलन सुरु झाल्यानंतर पहिले दोन दिवस आंदोलकांना आझाद मैदानामध्ये पावसात भिजावं लागलं. मैदान चिखलमय झाल्याने आंदोलकांच्या बसण्याची व उभे राहण्याची गैरसोय झाली. म्हणून आता मैदानावर रात्री कचखडी आणून टाकली आहे. त्याचबरोबर याठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

याबाबत आयोजकांशी सरकारनामा व साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी बातचीत करत माहिती घेतली. हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एकही व्यक्ती आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. समजा काही आजारपण, अडीअडणीमुळे कोणी गावाकडं गेलच तर त्याबदल्यात पाच व्यक्ती तो मुंबईत पाठवणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी एकुण सात टप्प्यामंध्ये हे आंदोलनाची तयारी केली आहे. पहिला टप्पा पूर्ण होत आहे, आता दुसरा टप्पा सुरु होत आहे अशी माहिती यावेळी आंदोलकांनी दिली.

Maratha Reservation Protest
Manoj Jarange Patil : ''फडणवीसांना त्यांच्या आईवर बोलल्यावर राग येतो, आमच्या आईचं सोन्यासारखं लेकरु..'' जरांगे भावूक

महापालिकेने आम्हाला केवळ आंदोलनासाठी जागा उपलब्ध करुन दिली. परंतु ज्या सोयी-सुविधा द्यायला हव्या होत्या त्या दिल्या नाही. त्यामुळे आंदोलकांना पावसात भिजावं लागलं. सौचालयाला पाणी नाही, प्यायला पाणी दिलं नाही. असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी रसद पाठवली. आता मराठा बांधवांनी आता भव्य दिव्य वॉटर वॉटरप्रूफ मंडप दिला आहे. त्याच्या उभारणीचं काम आम्ही करतोय अशी माहिती मराठा आंदोलकांनी यावेळी दिली.

Maratha Reservation Protest
Sharad Pawar Nashik: नाशिक असेल रणांगण ! शरद पवार फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, दोन दिवसाचं नियोजन

दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावली झाली. यावेळी कोर्टाने मुंबईबाहेरुन आता आंदोलकांना येऊ देऊ नका. आंदोलकांना ठाण्यातच थांबवा. कोर्टाने आंदोलकांना स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. परंतु आझाद मैदानावर मराठा बांधवांनी तब्बल 5000 जणांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याची सुरु केलेली तयारी पाहाता जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठ्यांचं वादळ इतक्या लवकर शांत होईल असं वाटत नाही. हे आंदोलन आणखी लांबण्याची शक्यताच त्यातून निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com