Maratha Reservation : मराठा आंदोलनावर तोडगा निघणार? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

Devndra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडत आहे.
Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी देखील सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या प्रकृती खालावत असताना डाॅक्टरांच्या पथकाने येऊन त्यांची तपासणी केली. मराठा आंदोलक आक्रमक होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठत होत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. आंदोलकांची समजूत कशी काढायची यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच जरांगे यांच्या मागण्यांकडे आपण सकारात्मकतेनच पाहतो मात्र कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून निर्णय घ्यावे लागतात, अशी भूमिका या बैठकीत मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस मराठा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत देखील बैठक करणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर देखील प्रशासनासोबत देखील बैठकी होणार आहे. प्रशासकीय पातळीवर यावर कसा तोडगा काढायचा यावर खल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Manoj Jarange Protest : जरांगेंच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फायदा नाशिक विभागाला : सर्वात कमी मराठवाड्याला

आंदोलक प्रचंड आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी थेट रेल्वे रुळावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सीएसएमटी स्थानक परिसरातील देखील आंदोलक आक्रम झाले आहेत. लोकलच्या कॅबिनमध्ये घुसून आंदोलकांनी पोस्टर लावत घोषणाबाजी केली.

Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Supriya Sule : आंदोलकांचा घेराव, बाटल्या फेकल्या तरीही सुप्रिया सुळे यांची शांत प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com