Maratha Reservation GR : राज्य सरकारकडून मराठ्यांची फसवणूक? राऊत म्हणाले, "सध्या जरागेंचं नेतृत्व शिखरावर, हा विषय संपला..."

Sanjay Raut on Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून नवा वादाला सुरूवात झाली आहे. मराठा समाजासाठी सरकारने काढलेला अध्यादेश म्हणजे केवळ मराठ्यांची फसवणूक असल्याचं काही मराठा नेते आणि अभ्यासक म्हणत आहेत.
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Shiv Sena’s Saamana editorial criticizes the Mahayuti government, accusing leaders like Eknath Shinde and Devendra Fadnavis of focusing on political rivalry over public welfare in Maharashtrasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 04 Sep : मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून नवा वादाला सुरूवात झाली आहे. मराठा समाजासाठी सरकारने काढलेला अध्यादेश म्हणजे केवळ मराठ्यांची फसवणूक असल्याचं काही मराठा नेते आणि अभ्यासक म्हणत आहेत.

याच सर्व प्रकरणावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर जरांगे पाटील मुंबईतून खुश होऊन मागे गेले असतील तर याचा अर्थ त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. या क्षणी जरागेंचं नेतृत्व शिखरावर आहे आणि त्यांच्या समाजाने त्या दिवशी फटाके वाजवून, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असेल तर हा विषय संपला असं मान्य केला पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, "मनोज जरांगे पाटील मुंबईत आपल्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या मराठी संदर्भात काम करणाऱ्या नेत्यांच्या पक्षांनी जरांगे मुंबईत असेपर्यंत त्याना पाठिंबा दिला. मराठी माणसांना मुंबईतून हुसकावून बाहेर लावता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Manoj Jarange Patil : 'जीआर'मधून फसवणूक झाली म्हणणार्‍या मराठा अभ्यासक अन् नेत्यांना जरांगेंनी दाखवला आरसा, म्हणाले, "आता जे बोंबलत आहेत ते बैठकीला..."

माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही असं जरांगे म्हणाले होते. पण आता ते माघारी गेले म्हणजे सरकार आणि त्यांच्यातील वाटाघाडी यशस्वी झाल्या. त्यामुळे आता जर त्यांचे सहकारी वेडवाकडं झालं म्हणत असतील तर तो सरकार आणि जरांगे यांच्यातील मुद्दा आहे.

या चर्चेत विरोधीपक्षाला कुठेही सहभागी करून घेतलं नव्हतं एवढंच काय सरकारमधील मंत्र्यांना देखील या चर्चेत सहभागी केलं नाही. जे वाशीमध्ये गुलाल उधळून आले ते देखील या चर्चेत नव्हते. शेवटच्या टप्प्यात ते मला दिसले नाहीत, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Maharashtra labour law : महाराष्ट्रातील कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ; कारखान्यांत 12 तर दुकानात 9 तास काम करण्याचा नवा नियम

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा आणि वाटाघाटी केवळ भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं सर्व श्रेय भाजपला मिळेल यासाठी अथक परिश्रम घेतलं आहे. त्यामुळे आता जर जरांगे खुश होऊन गेले असतील तर याचा अर्थ त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असतील.

त्यामुळे या क्षणी शिवसेना आपलं मत व्यक्त करणार नाही. मराठा समाजातील तरूणांना जरांगे म्हणत आहेत त्याप्रमाणे लाभ झाला असेल होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com