Maharashtra labour law : महाराष्ट्रातील कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ; कारखान्यांत 12 तर दुकानात 9 तास काम करण्याचा नवा नियम

Maharashtra Factories Act Amendments : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियमात विविध सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
Maharashtra Factories Act amendments
Maharashtra Factories Act amendmentsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 04 Sep : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियमात विविध सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

या निर्णयानुसार आता कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविणे यासाठी हे बदल केल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी हे बदल या आधीच केले आहेत. त्यामुळे आता या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील कारखाने अधिनियमात विविध सुधारणा केली आहे.

या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहणार आहे. तसंच यामुळे आता कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररीत्या अतिरिक्त उत्पन्न देखील मिळणार आहे.

Maharashtra Factories Act amendments
Maharashtra politics : OBC दुखावला अन् मराठे नाराज! जरांगेंच्या आंदोलनाचा नेमका प्रभाव कसा? दोन्हीकडून भाजपलाच फटका...

महत्वाचे म्हणजे कायदेशीर ओव्हरटाईम मर्यादा वाढवून कामगारांना मोबदल्याशिवाय अतिरिक्त काम करण्यास सांगितले जायचं यापासून आता आता कामगारांचं संरक्षण होणार आहे. तर ओव्हरटाईम न देता कामगारांकडून काम करवून घेण्याच्या प्रकाराला देखील आळा बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Factories Act amendments
Thackeray Brothers Defeat: छोट्या निवडणुकीतून ठाकरेंना मोठा इशारा; भाजप-शिंदेंना दिलासा

या बदलामुळे रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन, कामगार हक्कांचे संरक्षण होईल असा शासनाचा दावा आहे. तर कामाच्या वेळेबाबत सुधारणा केल्याने अतिकालिक कामाचा कालावधी वाढून कामगारांना वेतनाच्या दुप्पट मोबदला मिळेल असंही सरकारने सांगितलं आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओव्हरटाईम कामासाठी कारखान्यांना कामगारांची लेखी संमती घेणं आवश्यक असल्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा 20 आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू असतील. नव्या नियमानुसार दुकानांमध्ये दैनंदिन कामाचे तास 9 वरुन 10 तास करण्यात आले आहेत. खंडीत किंवा तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाल साडेदहा तासांवरून 12 तास करण्यात आला आहे. ओव्हर टाईमचा कालावधी 125 तासांवरुन 144 तास करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com