Maratha Reservation: जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कुणबी प्रमाणपत्राची लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच केली होळी

State Cabinet Meeting : राज्य सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेत ज्यांचे निजामकालीन पुरावे सापडले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा आदेश जारी केला.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News:  मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. यानंतर राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या. यानंतर राज्य सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेत ज्यांचे निजामकालीन पुरावे सापडले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा आदेश जारी केला.

Maratha Reservation
Maratha Reservation News : या पठ्ठ्याला मानलं ! शिंदेंना काढलं अन् जरांगेंना आणलं

यानंतर राज्यभरात मंगळवारपासून काही ठिकणी कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात झाली. बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील एका मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, या लाभार्थ्याने बुधवारीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते प्रमाणपत्र जाळून टाकत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सुमित माने यांना कुणबी प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर सुमित माने यांनी ते प्रमाणपत्र स्वीकारलंही होतं,पण या वेळी ते म्हणाले होते की, "सरकारने मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा मी हे प्रमाणपत्र परत करेल".

यानंतर बुधवारी सायंकाळी सुमित माने यांनी मिळालेले कुणबी प्रमाणपत्र जाळून टाकले. या वेळी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मला वाटले होते, प्रशासन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आहे. मात्र, तसं झालं नाही. फक्त मलाच कुणबी प्रमाणपत्र दिलं, त्यामुळे मी एकटा हे प्रमाणपत्र घेऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी प्रमाणपत्राची होळी आहे", असे सुमित माने यांनी म्हटले.

Edited By- Ganesh Thombare

Maratha Reservation
Maratha Reservation: नगरमध्ये दहा तरुणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com