Maratha Reservation Latest News Thane :
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार पोटतिडकीने सरकारकडे मागणी करत आहेत. ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्या, त्यांची ही मागणी योग्य आणि संविधानिक आहे. राज्य सरकारला फक्त ओबीसीमधून तर केंद्र सरकारला एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएसव्यतिरिक्त अन्य पर्यायातून आरक्षण देता येत नसल्याने सध्या दिलेले आरक्षण हे असंविधानिक आहे, असा दावा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केला.
बाळासाहेब आंबेडकर हे सांगतात "मराठ्यांचे ताट "वेगळे तर ओबीसींचे ताट वेगळे. " वेग - वेगळे ताट करणे, याचा अर्थ भारतरत्न कर्पुरी ठाकूर फार्म्युला वापरून, कुणबी मराठा एकत्र करून वेग-वेगळ्या ताटात आरक्षण दिले, तर सर्वच मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ होईल, असे राठोड म्हणाले.
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायदेशीर आणि संविधानिक असल्यामुळे आमचा त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ओबीसी नेते माजी खासदार राठोड यांनी सांगितले. तसेच दहा टक्के वेगळे आरक्षण देण्याचे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च: विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राज्य सरकारला अशा पद्धतीने स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेले आरक्षण हे असंविधानिक त्याचे पुनर्विलोकन करावे आणि ओबीसी आरक्षणाची 27 टक्क्यांची मर्यादा वाढवून मराठ्यांनाही ओबीसींमधून आरक्षण द्यावे. ते आरक्षण संविधानिक होईल आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकेल, असा दावाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.