Maratha Reservation : फडणवीस, अजितदादा कुठंय? मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंना बळीचा बकरा केलं जातंय!

Maratha Reservation Issue In Maharashtra Opposition Leaders : मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण आणि मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे राज्यभरात भडका उडाला आहे. यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. आता विरोधी पक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तर राज्य सरकारच्या पातळीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी पक्षांमध्ये एकजुटता दिसून येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नोंदी असलेल्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या!

डेंग्यू झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगड दौऱ्यावर गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना दिसत आहेत, तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सावध भूमिका घेताना दिसत आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी विरोधी पक्षांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षण प्रश्नी राज्यपालांनी हस्तक्षेप करून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी एकमेकांवर ढकलत आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न होतोय. संयुक्त सरकार म्हणून जबाबदारी असली आणि संयुक्तपणे काम केलं पाहिजे. तसंच मराठा समाजाच्या हितासाठी संयुक्तपणे निर्णय घेतला पाहिजे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले. तर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची मागणी असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

मराठा आरक्षणामुळे राज्यात अतिशय गंभीर स्थिती आहे. स्फोटक परिस्थिती आहे. जरांगे पाटील यांनी तब्येतही खराब झाली आहे. अशा नाजूक स्थितीत राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करून विशेष अधिवशन बोलवावं, अशी मागणी असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Rane Vs Thackeray : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले नाहीत?; नीतेश राणेंचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com