Rane Vs Thackeray : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले नाहीत?; नीतेश राणेंचा सवाल

Maratha Reservation News : मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी नेमकं काय काम केलं, याचीही माहिती द्यावी.
Nitesh Rane-Uddhav Thackeray
Nitesh Rane-Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पाटणकर अडचणीत आल्यानंतर दिल्ली गाठणारे उद्धव ठाकरे, मराठा आरक्षणासाठी दिल्लीला का गेले नाहीत?, असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. (Why Uddhav Thackeray did not go to Delhi for Maratha reservation: Nitesh Rane)

बाळासाहेबांच्या विचाराने चालण्याचा दावा करणाऱ्या उबाठा संघटनेचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटवापेटवीची भाषा करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे एक तरी भाषण किंवा एक तरी वक्तव्य मराठा आरक्षणाच्या बाजूने दाखवावे. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याची बाळासाहेबांची भूमिका होती, त्यामुळे ठाकरे आणि राऊत आरक्षणाची भाषा करत आहेत, हे बाळासाहेबांच्या विचारांविरोधात नाही का, असा सवालही या दोघांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane-Uddhav Thackeray
Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो; रवींद्र धंगेकरांचे धक्कादायक विधान

आज मराठा आरक्षणामुळे राज्यात परिस्थिती नाजूक आहे. एका बाजूला जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चिंता आहे, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तोडगा काढण्याचं काम सुरू आहे. आज मराठा समाजावर ही परिस्थिती का आली? याबद्दल विचार करायला हवा. मराठ्यांना नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिलं होतं. मराठे समितीच्या अहवालानंतर सरकारने आरक्षण जाहीर केलं होतं.

राणे म्हणाले की, कोर्टात पुढे या अहवालात काही त्रुटी काढण्यात आल्या. फडणवीस सरकारने गायकवाड अहवाल सादर केला आणि मराठ्यांना कोर्टात टिकणार आरक्षण दिलं. पुढे उद्धव ठाकरे यांचं शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं सरकार आलं आणि त्याचवेळी कोर्टात वकील दिले गेले नाहीत, योग्य कागदपत्रं दिली नाहीत, त्यामुळे आपल्याला हक्काचं आरक्षण गमवावं लागलं

Nitesh Rane-Uddhav Thackeray
Solapur Politics : आंबेडकरांचे महाआघाडी स्वागत,पण ते निर्णायक कुठे ठरलेत? ; सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेंनी किती बैठका घेतल्या, याची माहिती जाहीर करावी. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी नेमकं काय काम केलं, याचीही माहिती द्यावी. शिंदे-फडणवीस-पवार या महायुतीच्या सरकारवर जे टीका करत आहेत, त्यांनी या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण घालवण्याचे व रद्द करण्याचे काम केलं, असा आरोपही राणे यांनी केला.

ज्यांनी आरक्षण घालवलं, रद्द केलं, त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी समाजाला पेटवण्याचं काम केलं जातंय. ज्या नेत्यांनी आरक्षण दिलं, त्यांनाच प्रश्न विचारले जात आहेत. समाज म्हणून आपण याबद्दलचा विचार करावा, अशी विनंती करेन. तसेच महाविकास आघाडी सरकारने आरक्षण टिकवलं असतं, तर आज जरांगे पाटील यांना उपोषण करायला बसावे लागले नसतं, असेही राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane-Uddhav Thackeray
Kul Vs Raut : आमदार राहुल कुल २०२४ मध्ये जेलमध्ये दिसतील; संजय राऊतांनी वर्तविले भाकित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com