Shivjayanti : इस्त्राईलच्या भूमीत फडकला मराठी झेंडा : रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!

Shivjayanti : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचा इस्त्रायलाकडून विशेष सन्मान..
Shivjayanti :
Shivjayanti :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivjayanti : आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने एक अनोखी गोष्ट घडली आहे. इस्त्राईल या देशात एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे. तसेच, शिवराजस अष्टकचे निर्माते व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनाही खास निमंत्रण देवून, त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

दिग्पाल लांजेकर यांचू या संदर्भातली पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. लांजेकर म्हणातत की, "ईस्राईल... छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईल मधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे."

Shivjayanti :
NCP Leader Join shiv Sena : शिंदेंचा इचलकरंजीत राष्ट्रवादीला धक्का; आठ वर्षांपासून मोठ्या पदावर असलेल्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली.

त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली.

त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना.." अशी त्यांनी सविस्तर पोस्ट केली आहे.

Shivjayanti :
Cantonment Election 2023 : 'कँटोन्मेंट'चे बिगुल वाजले! पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह ५७ बोर्डांची निवडणूक जाहीर..

दिग्पाल लांजेकर हे शिवराय, त्यांचा इतिहास याबद्दल चित्रपटांची निर्मिती करत आहेत. (digpal lanjekar) शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली आहे. याच मालिकेतील पुढचा चित्रपट येत आहे.

शिवराज अष्टक मधील पुढचा सिनेमा म्हणजेच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. जून २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इस्त्राईल मध्ये दिग्पाल लांजेकर यांचा झालेला सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावतीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com