Milind Deora Resigns Congress : मिलिंद देवरांचा काँग्रेसचा राजीनामा; 10 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात?

Milind Deora Resigns from Congress Party : एकनाथ शिंदेंनी देवरांना उमेदवारीचे आश्वासन दिले?
Milind Deora In Shivsena
Milind Deora In Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी ही लढाई पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीतून या जागेचे दावेदार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत, यामुळे देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. यामुळे आता देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना जोर मिळत आहे. (Latest Marathi News)

Milind Deora In Shivsena
Ram Mandir : शंकराचार्यांच्या भूमिकेमुळं काँग्रेस तरणार? राम मंदिरावरून राजकारण तापलं... काय आहे कारण?

मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 विद्यमान पदाधिका-यांसह माजी खासदार मिलिंद देवरा यांचा आजच शिंदे गटात प्रवेशाची शक्यता आहे. देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी 11 वाजता सिद्धीविनायकाचं मंदिरात सपत्नीक दर्शन घेऊन मिलिंद देवरा आपली भूमिका माध्यमांसोर स्पष्ट करणार आहेत. त्यांनतर 10 माजी नगरसेवक आणि 25 विद्यमान पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह देवरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता रवाना होतील.

देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले नाही. या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्यानं येणा-या काळात मिलींद देवरा यांच्यावरुन भाजप-शिंदे गटातही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे

Milind Deora In Shivsena
Sachin Sawant : '...हे सांगण्यासाठी भाजप आणि मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे का?' ; सचिन सावंतांचा खोचक सवाल!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा दक्षिण मुंबईत पार पडला आणि या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी या मेळाव्या दरम्यान दाखवला. मात्र, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दक्षिण मुंबईत आपला प्रभाव जास्त असल्याचा दावा ठाकरेंनी केला, तर यावर काँग्रेसही दावा करेल, असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com