Uddhav Thackeray : कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंची भीष्मप्रतिज्ञा; म्हणाले, 'लोकसभा जिंकल्यानंतर...'

Eknath Shinde : ठाकरेंचा पहिला निशाणा मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kalyan Political News : निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही सत्तासंघर्षाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला. या निकालाविरोधात ठाकरेंनी पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत शिंदेंना टार्गेट करण्याचा निर्धार केल्याचे कल्याणमधील मेळाव्यातून दिसून आले. मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरेंनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे.

ठाकरेंनी कल्याण लोकसभा (Kalyan) मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी शाखेला त्यांनी भेट दिली. यावेळी शिवसैनिक यांच्याशी त्यांनी संवाद साधला. कल्याण लोकसभेचा आढावा घेतला. त्यानंतर तेथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. ठाकरे म्हणाले, 'कल्याण लोकसभेत आपणच विजयी होणार आहेत. त्या विजयाची पहिली सभा अंबरनाथ शिव मंदिरासमोर घेणार,' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Mahayuti News : अजितदादांनी उमेश पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मंत्र्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराची साफसफाई केली. यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केले. कल्याणमध्ये असलेल्या अंबरनाथ शिव मंदिरात, शेजारील नाल्याची साफसफाई करणे त्यांना दिसले नाही. त्यामुळे साफसफाई करायची असेल तर अंबरनाथ नाल्याची करा, अशी टीका शिंदे पिता-पुत्रावर केली.

'आता निवडणुकीत त्यांनी केलेला कचरा आपल्याला साफ करायचा आहे,' ठाकरे घणाघातही ठाकरेंनी केला. यावर कार्यकर्त्यांनी, 'तुम्ही फक्त आदेश द्या,' असा आवाज दिला. त्यास प्रतिसाद देताना, 'मी ऑलरेडी आदेश दिलेला आहे, तुम्ही कामाला लागा,' असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पहिला दौरा कल्याण आणि आजूबाजूच्या जवळपास सहा विधानसभा मतदार संघात होत आहे. या दौऱ्यात ठाकरेंना कार्यकर्ते जमवणे अवघड होणार असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी दिसून आली. त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागतही केले. या दौऱ्यात ठाकरेंनी शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. त्यामुळे ठाकरेंच्या निशाण्यावर थेट मुख्यमंत्री शिंदे असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Satara Loksabha : कोरेगावात नेत्यांचे बेरजेचे राजकारण; दोन्ही शिंदेंपैकी कोण देणार मताधिक्य ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com