Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरूवात झाली आहे. शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) थेट विधिमंडळ सभागृहात जाऊन बसले. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर नार्वेकर सभागृहातून बाहेर पडले. मात्र सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र न पाहताच, त्यांना सभागृहात प्रवेश कसा करू दिला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नार्वेकर यांच्या या कृतीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र यानंतर नार्वेकरांनी प्रेक्षक गॅलरीच समजून,आपण चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो होतो, असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण देवून वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.चूक लक्षात येताच,आपण बाहेर पडलो, असे ही नार्वेकर म्हणाले.
मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात : संजय शिरसाट
शिवसेनेचे एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट म्हणाले, "मिलिंद नार्वेकर हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना या विधिमंडळात येण्याची घाई झालेली दिसते, उद्धव ठाकरे देखील नार्वेकरांना जवळ करत नाहीत. अशा परिस्थितीत नार्वेकरांच्या आमदारकीचा रस्ता फक्त शिंदे गटातूनच जातो. न्यायालयीन लढाईनंतर आमच्याकडे किती इनकमिंग होईल आहे, हे लवकरच सगळ्यांना कळणार आहे," असे शिरसाट सूचकपणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.