कनाल, कदमांवरील धाडीनंतर शिवसेनेतून आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोन नेते अडचणीत आले आहेत.
 Minister Aaditya Thackeray
Minister Aaditya Thackeray Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोन नेते अडचणीत आले आहेत. युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अत्यंत जवळचे सहकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यावर प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावरही छापेमारी झाल्याचे समजते. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (Income Tax Raid News)

कनाल हे युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांच्या मुंबईतील घरी प्राप्तिकर विभागाने सकाळी छापा मारला आहे. कनाल हे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. संजय कदम हेही शिवसेनेचे स्थानिक नेते असून परब यांचे विश्वासू असल्याचे सांगितले जात आहे. या धाडसत्रामुळे शिवसेनेत पुन्हा खळबळ उडाली आहे. या छापेमारीनंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या प्रचार यंत्रणा म्हणून काम करत असल्याची टीका केली आहे.

 Minister Aaditya Thackeray
जुन्या प्रकरणात प्रसाद लाड अडचणीत; उच्च न्यायालयात घेतली धाव

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे आक्रमण दिल्लीचं आहे. निवडणूक जवळ आली आणि महाविकास आघाडीची भीती भाजपला वाटू लागल्यापासून हे सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्येही असंच झालं होतं. आता महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे कारवाया सुरू आहेत. भाजपच्या प्रचार यंत्रणा म्हणूनच केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत. पण महाराष्ट्र झुकणार आणि थांबणारही नाही, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (ता. 8) दुपारी चार वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याआधीच शिवसेनेच्या नेत्याच्या घरी धाड पडल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मागील पत्रकार परिषदेत राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्या व भाजवरही अनेक गंभीर आरोप केले होते. आजही ते भाजपवर शरसंधान साधण्याची शक्यता आहे. आज त्यांच्या रडारवर कोणता नेता असणार, याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत.

यशवंत जाधव यांची चौकशी सुरू

सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळा पैसा मनी लॉंड्रिंगच्या बेकायदेशीर मार्गाने पांढरा करून घेण्यात यशवंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या परिवाराचा घोटाळा आता चारशे कोटीच्या घरात गेला आहे, असा आरोप सोमय्या यांनी शनिवारी (ता.५) केला होता. उदय महावार या हवाला ऑपरेटरमार्फत जाधव यांनी कोट्यवधीचा काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

 Minister Aaditya Thackeray
शरद पवारांनी उलगडले आपल्या राजकीय डावपेचाचे गूढ!

प्राप्तिकर विभागाने जाधव परिवाराचे चारशे कोटींहून अधिक व्यवहाराचे घोटाळे बाहेर काढले असून आता कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपली कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली होती. जाधवांच्या जोडीने भुजबळ आणि गांधी परिवारावर त्यांनी पुन्हा मनी लॉंड्रिंगचा आरोप केला. जाधव यांचे काळ्याचा पांढरा पैसा केलेल्या महावार यानेच गांधी परिवाराच्या नॅशनल हेरॉल्ड कंपनीला अशी मदत केली होती, असे ते म्हणाले. जाधवांनी एक रुपयांचा शेअर पाचशेला विकून कमाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव परिवाराचा काळा पैसा पांढरा करण्यात एक आयएएस अधिकारी गुंतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com