Mangal Prabhat Lodha News: '' मी घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही...''; मंत्री लोढांचा ठाकरेंना खोचक टोला

Mumbai Political News : यापुढील काळात मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतील, त्यांचे कार्यालय म्हणून कार्यरत राहणार आहे.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai: मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आले. लोढा यांनी यावेळी मी घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही असा अप्रत्यक्ष टोलाही उध्दव ठाकरेंना लगावला.

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा(MangalPrabhat Lodha) यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात माध्यमांशी संवाद साधला. लोढा म्हणाले, महायुती सरकार जनतेमध्ये जाऊन काम करणारे सरकार असून, मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले.

Mangal Prabhat Lodha
BMC News: अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेचा तब्बल सव्वाचार कोटींचा खर्च; एक उंदीर मारण्यासाठी मोजले २३ रुपये

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी मुंबईत फिरलो, तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यापूर्वी पालकमंत्री म्हणून मी मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये फिरलो. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या प्राप्त झाल्या, त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे जागीच समाधान देखील केले. त्यातून जनतेच्या हक्काच्या या कक्षाची आवश्यकता अधोरेखित होते असंही लोढा यांनी यावेळी सांगितले.

याठिकाणी नागरिकांच्या अनेक समस्या मुख्य कार्यालयाशी निगडीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका(BMC) कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. हे कार्यालय यापुढील काळात देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतील, त्यांचे कार्यालय म्हणून कार्यरत राहणार आहे असं स्पष्टीकरण लोढा यांनी यावेळी दिले.

Mangal Prabhat Lodha
Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या दौऱ्यातच अहमदनगर 'मनसे'तील दुही आली समोर

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर...

माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचे सरकार होते. त्यावेळी मुंबईकरांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे आत्ता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाला ते का विरोध करत आहेत असा सवालही मंत्री लोढा यांनी उपस्थित केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com