BMC News
BMC NewsSarkarnama

BMC News: अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेचा तब्बल सव्वाचार कोटींचा खर्च; एक उंदीर मारण्यासाठी मोजले २३ रुपये

Mumbai Rat Kills News: उंदीर मारण्यासाठी आलेल्या खर्चाचा आकडा तब्बल सव्वा चार कोटींच्या घरात...
Published on

Mumbai : मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी तब्बल सव्वा चार कोटी रूपये खर्च केल्याचे समोर आले आहे. विधिमंडळात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानपरिषदेत राज्य सरकारने लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली आहे. उंदीर मारण्यासाठी लागणारा खर्च हा तब्बल सव्वा चार कोटींच्या घरात असल्याने याची मोठी चर्चा रंगली आहे.

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात मुंबई महापालिकेने कंत्राटदारांमार्फत १ लाख ८५ हजार २७० उंदीर मारल्याची माहिती समोर आली आहे. तर यासाठी प्रत्येकी २३ रुपये प्रमाणे ४ कोटी २६ लाख १ हजार २१० रुपये खर्च करण्यात आलेत.

BMC News
Bacchu Kadu News : ‘माझा सूर बदलण्याची कुणाची ताकद नाही, बोलावलं होतं म्हणून दिल्लीला गेलो होतो’

पावसाळ्यात साथीच्या रोगांचा धोका वाढू नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. महापालिका लेप्टो हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करते. या आजाराला पसरवण्यास कारणीभूत असलेल्या उंदरांना मारण्यासाठी महापालिकेकडून मोहिम राबवली जाते.

BMC News
Ahmednagar Politics : अजितदादांनी पुरवणी बजेटमध्ये सर्व आमदारांना केले "मालामाल"; पण मूळ विकासकामांच्या निधीचे काय ?

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात तब्बल मुंबईतील १ लाख ८५ हजार २७० उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. पण यासाठी तब्बल सव्वा चार कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती सरकारने दिली. पण उंदीर मारण्यासाठी झालेल्या वाढीव खर्चाचा मुद्दा याआधी देखील अनेकदा गाजला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com