Mira Bhayandar Assembly Election: मिरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले

Narendra Mehta and Geeta Jain supporters clash in Mira Bhayandar: विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली. मात्र, दुपारी भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले.
Assembly Election
Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होत आहे. या ठिकाणी महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवारात हायहोल्टेज लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली. याठिकाणी सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र दुपारी भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले.

मिरा भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौकात भाजप (Bjp) उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नरेंद्र मेहता (Narendra Mehta) पोहचले आणि वातवरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Assembly Election
Datta Bharne : शिरसटवाडीतील मतदान केंद्रावर आमदार दत्ता भरणेंची कार्यकर्त्यांना दमदाटी

सध्या या ठिकाणचे वातावरण शांत असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी जास्तीच जास्त प्रमाणात खाली उतरून मतदान करावे, बाकी लक्ष देऊ नये, असे आव्हान नरेंद्र मेहता यांनी केले. या प्रकारानंतर या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Assembly Election
Solapur Voting Percentage : सोलापूर जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत 43.49 टक्के मतदान; थंडीची तीव्रता कमी होताच टक्का वाढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com