Solapur, 20 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदासंघात दुपारी तीनपर्यंत ४३. ४९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत सांगोला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४८.३६ टक्के मतदान झाले, तर पंढरपूर मतदारसंघात सर्वांत कमी ३८.३० टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारी हळूहळू वाढ होत आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यावेळी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ११ मतदारसंघातून १८४ उमेदवार विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाला आज सकाळी सातपासून उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. दुपारच्या वेळी थंडी जरा कमी झाल्याने मतदान केंद्रांवरील वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे दुपारनंतरही महिलांची गर्दी कायम आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत ८ लाख ७८ हजार २८२ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून महिलाही पुरुष मतदारांच्या तोडीस तोड मतदान करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात तब्बल सात लाख ९५ हजार ३६४ महिला मतदारांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत एकूण १६ लाख ७३ हजार ६८६ मतदारांनी आपले मतदानाचे (Voting) कर्तव्य बजावले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत मतदारसंघनिहाय झालेले मतदान
अक्कलकोट....... ४७.१५ टक्के
सोलापूर दक्षिण..... ४१. ०२ टक्के
सोलापूर शहर मध्य....३९. २१ टक्के
सोलापूर शहर उत्तर.... ४०.३७ टक्के
मोहोळ................ ४३.५१टक्के
माढा..... ४५. ६७ टक्के
करमाळा....... ४२.४० टक्के
पंढरपूर....... ३८.३० टक्के
बार्शी.......... ४७.५० टक्के
माळशिरस.... ४५.१४ टक्के
सांगोला....४८.३६ टक्के
सोलापूर जिल्ह्यात एकूण ३ हजार ७३८ मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाला आहे. दुपारी तीनपर्यंत एकूण ४३.४९ टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या साठी जिल्ह्यात तब्बल ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.