Thane ShivSena News : ठाण्यात धाकधूक, महाआरती करत बाप्पाला साकडे!

MLA Disqua lification Case: निकाल काहीही लागला तरी आम्ही शिंदेसाहेबांबरोबरच आहोत, असे येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
mahaaarti
mahaaartisarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान

Thane : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील गणपती मंदिरात निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागावा, यासाठी महाआरती करण्यात आली. निकाल आमच्या बाजूनेच लागणार. निकाल काहीही लागला तरी आम्ही शिंदेसाहेबांबरोबरच आहोत, असे येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

ठाण्यात करण्यात आलेल्या आरतीला शिंदेसमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करून वेगळा गट निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा याच ठाण्याने त्यांच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. निकालाकडे आमच्या सर्वांची उत्सुकता आहे. निकाल काहीही लागला तरी ठाण्यातील सर्व शिवसैनिक आणि ठाणेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच असतील. पण निकाल हा आमच्या बाजूने लागेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे, अशा भावना यावेळी शिंदेंच्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.

mahaaarti
Rajya Sabha Election : एकही आमदार न जिंकलेल्या राज्यात भाजपने दिला उमेदवार; इतिहास घडणार?

शिवसेनेतून शिंदे बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदारांना घेऊन सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटी, गोवा करीत ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि अखेर भाजपशी हात मिळवत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू होते. अचानक झालेल्या सत्तांतरामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा आला. या सगळ्या प्रकरणावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल वाचण्यास दीड तास

विधानसभाध्यक्ष स्वतः निकालाचे वाचन करणार आहेत. साधारण 1200 पानांचा हा निकाल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सगळे निकालपत्र अध्यक्ष वाचून न दाखवता महत्त्वाचे मुद्दे, सारांश वाचून दाखवणार आहेत. निकालवाचन सुरू झाल्यापासून दीड तासात त्याचे वाचन पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

(Edited By Roshan More)

R...

mahaaarti
MLA Disqualification Case : अध्यक्षांनी घटनेनुसार निर्णय दिला, तर 100 टक्के... : भास्कर जाधवांचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com