MLA Disqualification case : शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणानंतर आमदार अपात्रतेबाबतही मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने तारीख केली निश्चित...

Background: The Shiv Sena Symbol Dispute Explained : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र घोषित करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
eknath Shinde and Uddhav Thackary
eknath Shinde and Uddhav ThackarySarkarnama
Published on
Updated on

Political Impact of the Upcoming Supreme Court Decision : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल आहेत. त्यापैकी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका बुधवारी कोर्टासमोर आली. त्यावर सुनावणीसाठी कोर्टाने 12 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. त्यानंतर गुरूवारी कोर्टासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची आमदार अपात्रतेबाबतची याचिका आली. या याचिकेवरील याचिकेची तारीखही कोर्टाने निश्चित केली.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र न ठरविण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी मागीलवर्षी जानेवारी महिन्यांत घेतला होता. याच निर्णयाला सुनील प्रभू यांनी मागील वर्षीच सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या प्रकरणावर आपला निर्णय दिला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरेंच्या आमदारांनाही अपात्र ठरविले नव्हते.

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनील प्रभू यांची याचिका आली. त्यावेळी प्रभू यांच्या बाजूने लढणारे ज्येष्ठ विविज्ञ कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले की, ‘काल मी नमूद केलेले हेच महाराष्ट्रातील प्रकरण आहे.’ त्यावर खंडपीठाने उद्धव ठाकरे यांच्या याचिकेसोबतच या याचिकेवरही 12 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यावर शिक्कामोर्तब केले. याबाबत ‘लाईव्ह लॉ’ने वृत्त दिले आहे.   

eknath Shinde and Uddhav Thackary
IPS death Case : पोलीस महानिरीक्षकांच्या आत्महत्येनंतर IAS पत्नी पदर खोचून मैदानात; 2 निर्णय, 4 मागण्यांनी अख्खं प्रशासन हादरलं...

बुधवारी कोर्टात काय घडलं?

उद्धव ठाकरेंची पक्ष-चिन्हाबाबतची याचिका बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर आली होती. काल सिब्बल यांच्या तातडीने सुनावणी घेण्याच्या विनंतीनंतर कोर्टानेही लगेच तयारी दर्शविली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी, आम्ही यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले.

कोर्टाच्या या निर्णयानंतर सिब्बल यांनी लगेच आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र घोषित करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात याचिकाही सूचीबध्द करण्याची मागणी सिब्बल कोर्टाला केली होती.

eknath Shinde and Uddhav Thackary
Bihar Election update : मोदी-नितीश जोडीचे बिहार जिंकण्याचे सर्व प्लॅन फेल होणार? तेजस्वी यादव यांची क्रांतीकारी घोषणा...

सिब्बल यांच्या या मागणीवर न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले होते की, ‘अयोग्यतेचे प्रकरण अन्य खंडपीठासमोर सूचीबध्द आहे. दोन्ही प्रकरणे सोबत सूचीबध्द करण्यासाठी तुम्हाला सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल.’ कोर्टाच्या या सुचनेवर सिब्बलही लगेच तयार झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com