Bhiwandi News : भिवंडी महापालिकेची निवडणूक भाजप समर्थक जिंकण्यासाठी जोरदार प्रचार करत असताना धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप आमदार महेश चौघुले समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा घातला. विशेष म्हणजे या सभेसाठी पोलिस हजर असताना त्यांच्यासमोर ही हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भाजप आमदाराच्या समर्थकांच्या या राडेबाजीमुळे एकच गोंधळाला सुरुवातीला झाली. पोलिस बघ्याची भूमिकेमध्ये होते. मात्र महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ लागल्यानंतर हस्तक्षेप करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपने पॅनल उभा केला आहे. भाजप आमदार महेश चौघुले विरोधात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील निवडणूक लढवली होती. तेव्हापासून या दोन गटात वाद आहे.
या प्रभागात माजी महापौर विलास पाटील पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील व मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप आमदार महेश चौघुले यांनी भाजपचा पॅनल उभे केला असून, ज्यामध्ये त्यांचा मुलगा मित चौघुले निवडणुकीच्या रिंगणात आहे.
माजी महापौर प्रतिभा पाटील यांनी महिलांसोबत कोंबडपाडा गणपती मंदिर इथं सभा सुरू असताना आमदार महेश चौघुले समर्थकांनी सभेत घुसून महिलाना शिवीगाळ करीत राडा घातला. यानंतर सभेतील महिलांनी विरोधकांना तुम्ही इथं का आले, याचा जाब विचारला. यातून आमदार चौघुले समर्थकांनी सभेत राडा घालण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
प्रतिभा पाटील व महिला समर्थकांसह निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी दाखल झाल्या. पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करीत असल्याने तिथेही गोंधळ झाला. हा वाद पुढे वाढत असल्याने पोलिसांनी गोंधळाची नोंद घेत प्रकरण शांत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.