आमदार महेश शिंदेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

महेश शिंदे यांनी सांगितले की माझी प्रकृती ठणठणीत असून मी विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन. जनतेने लस मिळेपर्यंत शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
MLA Mahesh shinde tested Corona positive
MLA Mahesh shinde tested Corona positive
Published on
Updated on

खटाव : कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर काही महिन्यानंतर पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते विलगीकरण कक्षात असून तज्ञ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांची पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले.

गेले अनेक दिवसापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वत्रच वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील खटाव व माण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात दौरे करता त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे.

यासंदर्भात महेश शिंदे यांनी सांगितले की माझी प्रकृती ठणठणीत असून मी विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन. जनतेने लस मिळेपर्यंत शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनिवार्यच असेल तर सामाजिक अंतराच्या अटीचे पालन करून मास्कचा वापर करावा. सातत्याने हात स्वच्छ धुवावेत, असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारसंघातील जनतेला केले.

आमदार महेश शिंदे यांची बहिण डॅा. अरुणा बर्गे म्हणाल्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यांच्यासाठी हा आजार गंभीर आहे. आधी झालेल्या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असेल तरी व्हायरस हल्ला करू शकतो. आमदार सध्या विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. त्यांचे सर्व अहवाल
नॅार्मल आहेत. चिंतेचे काही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com