Kolhapur Politics News : शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; विशेष अधिवेशन बोलावून...

Kolhapur Politics News : काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
Kolhapur Politics News
Kolhapur Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : मराठा आरक्षणाविषयी राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच मंगळवारी कोल्हापूरच्या खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणावरून मराठा समाज राज्यात आक्रमक झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार आणि खासदांरानी केली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics News
BJP MLA Prashant Bumb News : काल मराठा आरक्षणाला पाठिंबा अन् आज आमदार बंब यांचे कार्यालय फोडले...

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. या वेळी कोल्हापूर लोकसभा खासदार संजय मंडलिक , आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, विधान परिषद सभापती आमदार नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. आजपर्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने राज्यभर लढा सुरू ठेवून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. राज्यात शांततेच्या मार्गाने लाखो जनसमुदायाच्या सहभागाने ५७ विराट मोर्चे काढून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. संयमाने न्याय मागण्या केल्या जात आहेत. आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

Kolhapur Politics News
NCP Replied PM Modi : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीने यादीच दिली

त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावांमध्ये लाक्षणिक उपोषणे, आंदोलने सुरू असून आमदार, खासदार, मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे. काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाचे गांभीर्य व त्यांच्या तब्येतीचा विचार करता तसेच संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा विचार करता सदर उपोषण स्थगित करणेच्या अनुषंगाने शासनाकडून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्वरित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com