Nilesh Lanke News : आमदार लंके संतापले; मुख्यमंत्री शिंदेंनी भेट देऊनही अतिवृष्टीग्रस्तांना मदत नाहीच

Vidhan Sabha News : आमदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नावर वेधले सरकारचे लक्ष
Eknath Shinde, Nilesh Lanke News
Eknath Shinde, Nilesh Lanke NewsSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याच पाठविण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आणून देत आमदार नीलेश लंके यांनी सभागृहात महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. एप्रिलमध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करुन सुद्धा तत्कालीन तहसीलदारांनी नुकसानीच्या याद्याच पाठवल्या नसल्याने लंके सभागृहात चांगलेच संतापले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी वनकुटे येथे ज्या दोन कुटूंबांना भेट दिली केवळ त्याच दोन कुटूंबांना पत्र्याचे शेड करून निवारा मिळाला. उर्वरीत गोर गरीब कुटुंब आजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. आठ दिवसांत पंचनामे करून मदत देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली होती.

Eknath Shinde, Nilesh Lanke News
PCMC Railway Station Bhumi Pujan: पिंपरीतील रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी मोदींच्या हस्ते

या प्रकारणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबच सर्व वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी लंके यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधत सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे ९६ गावांतील ३४ हजार ९३७ शेतकरी बाधित झाले होते, हा प्रश्न विधानसभेत मांडत लंके यांनी त्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

यंदा ७ ते ९ एप्रिल दरम्यान मतदारसंघात पुन्हा अतिवृष्टी झाली. त्याची दखल घेत दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी तालुक्यातील वनकुटयाचा दौरा केला होता. सात दिवसांत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली होती. मात्र, चार महिने उलटूनही ही मदत मिळाली नसल्याचे लंके यांनी सांगितले.

Eknath Shinde, Nilesh Lanke News
Monsoon Session News : शहांनी विरोधकांना ठणकावले : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत गोंधळ

तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय करीत त्यांच्या याद्या शासनाकडे पाठविल्याच नाहीत. त्यामुळे हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. तत्कालीन तहसिलदार आवळकंठे यांच्यावर दप्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वनकुटे गावचे माजी सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी केली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com