Maharashtra Winter Session 2022 : राहुल कुल यांनी पु्ण्याच्या 'या' महत्वाच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला

Maharashtra Winter Session 2022 : रिंगरोडचे रखडलेले काम लवकर सुरु करावे," असे राहुल कुल यांनी आज अधिवेशनात सांगितले.
BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
BJP MLA Rahul Kul Latest Marathi NewsSarkarnama

Rahul Kul: पुणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा प्रश्नाबाबत आज (बुधवारी) आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी लक्षवेधी मांडली. (Maharashtra Winter Session 2022 news update)

"पुणे जिल्ह्यासाठी महत्वाचा असणाऱ्या रिंगरोडचे काम रखडले आहे.ज्याप्रमाणे पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. त्याचप्रमाणे रिंगरोडचे रखडलेले काम लवकर सुरु करावे," असे राहुल कुल यांनी आज अधिवेशनात सांगितले.

"पुणेकर घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना वाहतुकीची सामना करावा लागतो, ही समस्या टाळण्यासाठी सरकारने रखडलेल्या रिंगरोडचे काम लवकरच पुढाकार घ्यावा," असे राहुल कुल यांनी सांगितले.

"पुण्याच्या पश्चिम भागात दीडहजार हेक्टराचे संपादन राहिले नाही. राज्य सरकारने हे काम सुरु केले असले तरी जागेवर हे काम संथगतीने सुरु आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन शहरापुरता नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे भाग करण्यात आले आहेत. हे भूसंपादन कधीपर्यंत करणार, किती निधी आवश्यक आहे, रक्कम किती दिवसात करणार. खडकवासला टनेल, उडाणपूलाचे नियोजन करणार का," आदी प्रश्न राहुल कुल यांनी विचारले.

BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
Anil Deshmukh : स्वीय सहायकासोबतच देशमुख आज कारागृहाबाहेर येणार का ?

मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, पश्चिम भागातील कामाचे निवाडे हे फेब्रुवारी २०२३ पर्यंत जाहीर केले जातील आणि त्यानंतर दोन महिन्यात भूमिसंपादन केले जाईल. पूर्व भागातील कामाचे निवाडे हे जून २०२३ पर्यंत करण्यात येतील, त्यानंतर दोन महिन्यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया केली जाईल, असे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले. २०२६ पर्यंत या रिंगरोडचे काम पूर्ण होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. संपादनाची प्रक्रिया सुरु आहे, मुदतीत हे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. आमदार भीमराव तापकीर यांनीही याबाबत भूसंपादनाच्या रक्कमेबाबत विचारणा केली.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून ( १९ डिसेंबर) नागपुरमध्ये सुरु झाले आहे. आज अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session 2022) तिसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आजही सीमावादावरुन सत्ताधारी आणि आमने-सामने येणार आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाबाबत राज्य सरकारने ठराव मांडावा, अशी मागणी केली आहे. पवार आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com