Amit Shah News : शरद पवारांच्या माफीवर अमित शाहांचा पलटवार, अजित पवारांचा उल्लेखही टाळला?

Sharad Pawar : शरद पवार यांनी आपल्या अमरावतीमध्ये झालेल्या सभेत गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची जाहीर माफी मागितली. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी राणा या भाजपच्या उमेदवार आहेत.
Amit Shah Sharad Pawar
Amit Shah Sharad Pawarsakarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील मिळून आठ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आज (बुधवारी) प्रचार तोफा थंडावण्याच्या आधी अमरावतीमध्ये राहुल गांधी Rahul Gandhi, अमित शाह यांच्या जाहीर सभा झाल्या. अमित शाह यांनी आपल्या जाहीर सभेतून काँग्रेससोबत शरद पवार यांना टार्गेट केले.

Amit Shah Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : तब्येतीमुळे 'रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला' न येणारे शरद पवार प्रचारासाठी गावोगावी कसे फिरत आहेत? शाहांचा सवाल!

शरद पवार Sharad Pawar यांनी आपल्या अमरावतीमध्ये झालेल्या सभेत गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची जाहीर माफी मागितली. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी राणा या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचार सभेत बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांनी मागितलेल्या माफीवरून त्यांना उलटे सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावतीकरांची माफी मागणाऱ्या शरद पवारांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री असताना विदर्भासाठी काय केले हे सांगावे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शरद पवारांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माफी मागावी, असे जाहीर आवाहन अमित शाहांनी Amit Shah पवारांना केले.

अजित पवारांचा उल्लेखच नाही

अमित शाह यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला नाही. सभेसाठी असणाऱ्या बॅनरवरदेखील अजित पवार यांचा फोटो नसल्याने त्यांनी नवनीत राणा यांना सुनावले होते.

मी जिद्दी माणूस...

अमित शाह यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व नेत्यांचा उल्लेख केला. नवनीत राणा यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र, आपले भाषण थांबवत टीव्हीच्या पत्रकारांना खाली बसण्याचे आवाहन केले. मला अमरावतीकरांना पाहायचे आहे. टीव्हीच्या पत्रकारांनी खाली बसावे, असे शाह म्हणाले. मात्र, समोरील पत्रकार खाली बसले नाहीत. त्यावेळी मी जिद्दी माणूस आहे. मी माझे भाषण सुरू करणार नाही. तु्म्ही खाली बसा असे खडसावले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com