Nishikant Dubey : रेस्टॉरंट, अनेक फ्लॅट, दुकान...एवढी मालमत्ता..! खासदार दुबेंनी ठाकरेंच्या नेत्याचा भ्रष्टाचार काढला...

Nishikant Dubey’s Allegation Against Shiv Sena (UBT) Leader : खासदार निशिकांत दुबेंनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.
BJP MP Nishikant Dubey accuses a Shiv Sena (UBT) leader of corruption in a viral social media post, escalating political tension.
BJP MP Nishikant Dubey accuses a Shiv Sena (UBT) leader of corruption in a viral social media post, escalating political tension. Sarkarnama
Published on
Updated on

BJP vs Shiv Sena (UBT): Rising Tensions : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्दायावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विरोधानंतर या वादात उडी घेतली आहे. त्यांनी थेट मराठी विरूध्द इतर भाषिक अशा वादाला फोडणी देत महाराष्ट्राविषयी गरळ ओकली होती. त्यावरून महाराष्ट्रात वादळ उठले. पण त्यानंतरही दुबे थांबलेले नाहीत.

खासदार दुबेंनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. दुबेंनी याबाबत सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहानी असे म्हणत त्यांनी संबंधित नेत्याचे किती, कुठे फ्लॅट आहेत, याची माहिती सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

संबंधित नेत्याचे मुंबईतील विविध ठिकाणचे फ्लॅट आणि कोकणातील मालमत्तांचा समावेश दुबेंनी या माहितीमध्ये केला आहे. सांताक्रुझमध्ये 3 बीएचके फ्लॅट, बांद्रामध्ये 4 बीएचके फ्लॅट, नालासोपारातील रचना, रामेश्वर, समृध्दी, मातृभक्तीमध्ये फ्लॅट, विरारमधील एअर इंडियाच्या कॉलनीत फ्लॅट असल्याची माहिती दुबेंनी दिली आहे.

BJP MP Nishikant Dubey accuses a Shiv Sena (UBT) leader of corruption in a viral social media post, escalating political tension.
Nishikant Dubey Controversy : दुबेंचा डाव आधी समजून घ्या, ही गरळ उगाच नाही; महाराष्ट्राला डिवचण्याची ही आहेत 3 कारणे...

एवढेच नाही तर बोरिवलीमध्ये कमर्शियल शॉप, नालासोपारा येथे रेस्टॉरंट, कोकणात केळवे येथे रेसिडेन्शिल प्रापर्टी संबंधित नेत्याकडे असल्याचा दावाही दुबेंनी केला आहे. अशी माहिती देतानाच दुबेंनी एवढा पैसा कुठून आणता?, असा सवालही केला आहे. दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये संबंधित नेत्याचे नाव मात्र लिहिलेले नाही. त्यामुळे एवढी मालमत्ता ठाकरेंच्या कोणत्या नेत्याकडे आहे, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

BJP MP Nishikant Dubey accuses a Shiv Sena (UBT) leader of corruption in a viral social media post, escalating political tension.
Opposition Leader row : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद थेट सरन्यायाधीशांच्या कोर्टात; नेत्यांनी साधली संधी...

राज ठाकरेंवरही निशाणा

दुबेंनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये राज ठाकरेंना पुन्हा निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना जनतेचे समर्थन मिळत नाही, तेव्हा गुंडांना पुढे करतात. म्हणजे गुंडगिरीच त्यांचा उद्देश आहे. माझा विरोधा ठाकरेंच्या गुंडगिरीला आहे. सहनशीलतेची सीमा संपली आहे. मराठा समाज नेहमीच आदरणीय आहे. देश आपल्या सर्वांचा आहे. मी जिथून खासदार आहे तिथे मराठा मधु लिमये तीनदा खासदार होते. ठाकरे शुध्दीत या, तुमच्या लढाईला मराठी बनवू नका, मुंबईच्या विकासात आमचेही योगदान आणि आणि राहील, असे दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com