Manoj Jarange : मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित; काय आहे पुढचा प्लॅन?

Maratha Reservation : एक महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan Bhumre
Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करण्यासाठी त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केले होते. मात्र मंत्री शंभुराज देसाई Shambhuraj Desai यांची शिष्टाईने जरांगेंनी सहाव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. यामुळे सरकारला दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

उपोषण सुरू केल्यापासून जरांगे पाटलांची Manoj Jarange मनधरणी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर असल्याचे सांगून जरांगेंना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शंभुराज देसाईंनी गुरुवारी जरांगेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. त्यांनी जरांगे यांच्याकडे एका महिन्याची मुदत मागितली. ती मान्य करत जरागेंनी गुरुवारी उपोषण स्थगित केले आहे.

दरम्यान, जरांगेंनी एक महिना नाही तर 30 जूनचीच मुदत दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी महिन्याची मुदत मान्य केली. ही मुदत मान्य करताना जरांगेंनी सरकारला इशाराही दिला आहे. एक महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नाव घेऊन एकाएकाला विधानसभेत पाडणार असल्याचेही जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan Bhumre
Video Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, 'एक महिन्यात...'

मराठा-कुणबी एकच आहेत. राज्यात मराठा-कुणबीच्या लाखो नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येते. आता त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावे, आंदोलनावेळी मराठ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या आपल्या मागण्यांचाही जरांगेंनी पुनरुच्चार केला. या महिन्यात आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत सरकारला परिणाम भोगवे लागतील, असा इशारा देत जरांगेंनी आपले उपोषण सहाव्या दिवशी स्थगित केले.

Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan Bhumre
Video Pune BJP : कसब्यातील यशावरुन भाजपात 'पॉस्टर वॉर'! गौरव बापट संतापलेच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com