Mumbai : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असताना पाकिस्तानी कलाकरांना भारतात संधी देण्यावरून मनसेने अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी बाॅलिवडूमधील कलाकारांना देखील मनसेकडून टार्गेट करण्यात आले. आता पाकिस्तानी कलाकरांना संधी देण्याच्या कारणावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी गायक अरिजित सिंह याला टार्गेट करत पाकिस्तानी कलाकार येथे खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. (Ameya Khopkar News )
'अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजित सिंह करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल, असे ट्विट मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची (MNS) भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.' असे देखील आपल्या ट्विटमध्ये अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
अमेय खोपकर यांनी गेल्या वर्षी देखील एक ट्विट करत पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांना विरोध केला होता.भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, असे अमेय खोपकर म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.