Ashish Shelar Meet Raj Thackeray: मनसेकडून उमेदवाराची घोषणा; भाजपचे शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, कोकण मतदारसंघ कोण लढवणार?

Legislative Council Elections: मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांची उमेदवाराची जाहीर केली असली, तरी सध्या कोकण मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत.
Raj Thackeray, Ashish Shelar
Raj Thackeray, Ashish ShelarSarkarnama

Ashish Shelar Meet Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच आता महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आराम न करता पुन्हा राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी भेटीगाठी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज यांना आता भाजप पाठिंबा देणार का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. (Legislative Council Elections)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात लोकसभेनंतर आता लगेचच विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, प्रचारापासून काही काळ दूर झालेले राजकीय नेते विधानपरिषदेसाठी मैदान उतरल्याचं दिसत आहे. तर आता पुन्हा युती-आघाड्यांसाठी, एकमेकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मनसेनं (MNS) अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Graduate Constituency) उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप आणि मनसेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कारण मनसेनं उमेदवाराची जाहीर केली असली, तरी सध्या कोकण मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) हे आमदार आहेत. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ मनसेला सोडणार की स्वत: लढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मनसेनं उमेदवारी जाहीर करताच आशिष शेलार यांनी मनसेला शुभेच्छा देताना भाजप कोकण पदवीधर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं.

Raj Thackeray, Ashish Shelar
Suresh Mhatre Vs Kapil Patil: निकालाआधीच भिवंडीत राजकारण तापलं, बाळ्यामामांचा कपिल पाटलांवर गंभीर आरोप; 'मनोज म्हात्रे हत्येत...'

त्यामुळे भाजपने या जागेवरील दावा सोडला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शेलारांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर 26 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. मनसेनं अभिजीत पानसेंना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजी नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, महायुतीकडून नेमका कोणाचा उमेदवार फायनल होणार? आणि या निवडणुकीत मनसेला भाजपच्या पाठिंब्याची अपेक्षा असून भाजप तो पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com