MNS And NCP : मनसे-मिटकरी राड्यानंतर बाळा नांदगावकरांनी घेतली अजितदादांची भेट, नेमकी चर्चा काय?

Bala Nandgaonkar Meets Ajit Pawar : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
Raj Thackeray | Amol Mitkari | Ajit Pawar
Raj Thackeray | Amol Mitkari | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे विरुद्ध अजित पवार गट असा वाद सुरु आहे.

अशातच आता मंत्रालयात मनसे नेत्यांनी थेट अजितदादांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

मात्र, मिटकरींनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) बोलणं मनसैनिकांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी थेट अमोल मिटकरींवर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर मनसे विरुद्ध अजित पवार गट यांच्यात चांगलीच जुंपली होती. दोन्ही पक्षातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला होता.

Raj Thackeray | Amol Mitkari | Ajit Pawar
VIDEO काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; 'क्रॉस व्होटिंग' कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम ठोकणार

या वादाच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि अजितदादांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिवाय या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही खलबतं होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com