Raj Thackeray : मनसेने उडवला धुरळा! विधानसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाच केली

MNS Vidhan Sabha Election : अविनाश जाधव यांनी संदीप राणे मिरा भाईंदर विधानसभेचे उमदेवार असणार अशी घोषणा केली. मीरा भाईंदर विधानसभेसाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत.
Mira Bhayandar MNS
Mira Bhayandar MNSSarkarnama

Mumbai Political News : लोकसभेचा निकाल लागताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत प्राथमिक स्तरावरच चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे मात्र मनसेने थेट उमेदवारच जाहीर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

मनसेकडून मीरा भाईंदरमधून विधानसभा निवडणुकीसाठी संदीप राणे यांचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे महायुतीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनसेच्या राज ठाकरे Raj Thackeray यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र विधानपरिषदेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांचे नाव समोर केले. त्यानंतर उमेदवारी मागे घेतली असली तरी महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा झाली. त्यानतंर तीन महिने दूर असलेल्या विधानसभेसाठी उमदेवारी जाहीर करण्यावरही मनसेने भर दिल्याचे दिसून येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मीरारोड येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी संदीप राणे मिरा भाईंदर विधानसभेचे उमदेवार असणार अशी घोषणा केली. मीरा भाईंदर विधानसभेसाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Mira Bhayandar MNS
Pune Politics : आता माजी नगरसेवकांना आमदार व्हायचंय! पुण्यात चुरस वाढणार; काय आहे कारण?

मनसेने MNS विधानसभेचा निवडणुकीसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. संदीप राणे हे मीरा भाईंदर मनसेकडून मैदानात उतरल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यापूर्वीच अविनाश जाधव यांनी केलेल्या घोषणने मनसेचा 'एकला चलो'चा नारा दिला तर तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Mira Bhayandar MNS
Sandeep Deshpande on Bhujbal : 'राज ठाकरेंविरोधात 'त्यावेळी' रचलेल्या षडयंत्राचा भुजबळही व्यापक भाग होते' ; संदीप देशपांडेंचं खळबळजनक विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com