Sandeep Deshpande on Bhujbal : 'राज ठाकरेंविरोधातल्या 'त्या' षडयंत्रात भुजबळही..!'; संदीप देशपांडेंचा खळबळजनक दावा

Sandeep Deshpande warn Chhagan Bhujbal : '...तर भुजबळ अडचणीत येतील', असा इशाराही संदी देशपांडे यांनी छगन भुजबळांना दिला आहे.
Sandeep Deshpande and Chhagan Bhujbal
Sandeep Deshpande and Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal on Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केल्याचे म्हटले.

त्यानंतर आता मनसेकडून भुजबळांवर पलटवार करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भुजबळांबाबत एक मोठं विधान केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

भुजबळांच्या वक्तव्यवार बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) म्हणाले, 'शिवसेनेत असताना राज ठाकरेंविरोधात बडव्यांनी षडयंत्र रचलं होतं आणि छगन भुजबळ त्या षडयंत्राचा भाग होते, असं खळबळजनक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. एवढंच नाहीतर आम्ही जर तोंड उघडलं आणि तेव्हा काय काय घडलं हे जर सांगितलं तर भुजबळांची अडचण होईल'

Sandeep Deshpande and Chhagan Bhujbal
Video Chhagan Bhujbal : भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका, शिंदे गटाच्या आमदाराची संतप्त प्रतिक्रिया !

याशिवाय 'ज्यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांचं पहिलं वाक्य होतं आणि भाषणाची सुरुवातच ही होती की माझा वाद हा विठ्ठलाबरोबर नाही तर आजूबाजूच्या बडव्यांबरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली याचं कारण सुस्पष्ट आहे.' असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

तसेच, 'दुसरी महत्त्वाची गोष्टी ज्या पद्धतीने हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभोवताली बडवे होते. त्यांनी जे राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र रचलं, ते भुजबळांना माहीत नाही का? काय षडयंत्र रचलं गेलं. भुजबळ(Chhagan Bhujbal) स्वत: त्या षडयंत्राचा व्यापक भाग होते. हे कदाचित भुजबळ विसरले असतील पण ते होते भाग हे त्यांनाही माहीत आहे.' असं मोठं विधान देशपांडे यांनी केलं.

Sandeep Deshpande and Chhagan Bhujbal
Raj Thackeray Meeting : विधानसभेसाठी मुंबई आणि परिसरातील 20 जागांवर मनसे करणार दावा ?

याचबरोबर 'त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेना(Shivsena) का सोडली, या सगळ्या गोष्टी आता भुजबळांनी बोलू नयेत. मग आम्ही जर सगळं त्यावेळी काय घडलं हे सांगतिलं तर भुजबळ अडचणीत येतील.' असा इशाराही संदीप देशपांडे यांनी छगन भुजबळांना दिला आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते? -

'राज ठाकरे यांनी मनसे काढूनच नव्हे तर शिवसेना सोडून चूक केली. कारण, त्यानंतर साहाजिकच एकमेकांवर टीका-टिप्पणी झाली. शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या टीका-टिप्पणी झाली की नाही? याची काय गरज होती. बाळासाहेबांनी सांगितलं असतं तू हे नाही, ते काम कर तर ऐकायचं होतं.' असं छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com