MNS Vs Shivsena : 'एकनाथ शिंदेंवर नाही ठपका मग अधिकारी-ठेकेदारांना विचारा', मनसेच्या माजी आमदाराचा टोला

Raju Patil Criticizes Eknath Shinde : कल्याण ग्रामीण आणि शहरी भागात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
Raju Patil criticizes Eknath Shinde and Nana Patekar, raising political heat in Maharashtra.
Raju Patil criticizes Eknath Shinde and Nana Patekar, raising political heat in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Raju Patil News : राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचा समाचार मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी घेतला आहे.

राजू पाटील यांनी ट्विटवर आपले मत व्यक्त करताना, 'म्हणे कोणताही ठपका व ठिपका नसलेला नेता….. ! एकदा अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना विचारा नाना' असे म्हटले. या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना देखील टोला लगावल्याची चर्चा आहे.

Raju Patil criticizes Eknath Shinde and Nana Patekar, raising political heat in Maharashtra.
Shinde Shivsena leader news: शिंदे गटाच्या बड्या नेत्याची अडचण वाढली; महिलेचा विनयभंग, दीड कोटी फसवणुकीचा गुन्हा

नानाची टांगी...

राजू पाटील यांनी ट्विट करताना नानाटी टांग असे हॅशटॅग देखील वापरले आहे. नानांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे पाटील यांनी एकप्रकारे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी राजू पाटील आणि मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. मात्र, विधानसभेला एकनाथ शिंदेंनी राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार देत त्यांचा पराभव केला होता.

शिवसेना-मनसे संघर्ष वाढणार

कल्याण ग्रामीण आणि शहरी भागात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मनसेला चांगला पाठींबा आहे. राजू पाटील हे पराभूत झाले असले तरी आपण राज ठाकरेसाहेबांसोबत कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे वर्चस्वासाठी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना होण्याची शक्यता आहे.

नाना पाटेकर नेमके काय म्हणाले?

नाना पाटेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेंकडे कोणी बोट दाखवू शकत नाही.

Raju Patil criticizes Eknath Shinde and Nana Patekar, raising political heat in Maharashtra.
Jalgaon ex MLA Joins BJP: जळगाव जिल्ह्यातील 'या' माजी आमदाराला जायचंय भाजपात, त्यासाठी अजित पवारांकडेही जाणं टाळलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com