

Bala Nandgaonkar, Raj Thackeray
Sarkarnama
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांची ओळख आहे. पण मागील काही दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेच्या (MNS) पुण्यातील नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर नांदगावकर हेही राज ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यावर नांदगावकर यांनी एका गाण्याच्या ओळीतच आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सुत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडियाच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात. हे आपणास माहीतच आहे, असं सांगत नांदगावकर यांनी याबाबत खुलासा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम... ही गाण्याची ओळ टाकत आपण राज ठाकरे यांच्यासोबत अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
'मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही,' असं नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते. तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम,' असा शेवट नांदगावकर यांनी केला आहे.
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी...
दीड महिन्यांपूर्वीही नांदगावकर यांनी अशीच पोस्ट टाकली होती. जीवनात अनेक लोक येतात परंतु कायमस्वरूपी मनावर राज्य करणारे मिळणे म्हणजे सौभाग्यच. राजसाहेबांच स्थान हे असेच, माझ्या वाटचालीत तसेच जडणघडणीत राजसाहेब यांचे मला कायमच प्रेम, मार्गदर्शन लाभले. मी सुद्धा यथाशक्ती माझी निष्ठा, माझे प्रेम सर्वस्व साहेबांना अर्पण केले. साहेबां प्रति माझे हे प्रेम, ही निष्ठा ही कायमच आहे व राहील. तसेच जन्मोजन्मी साहेबांची अशीच सोबत राहो हीच सदिच्छा. कारण काही नाते हे एका आयुष्यापुरते नसून जन्मोजन्मी चे असतात ते म्हणतात ना, "जिंदगी के साथ भी , जिंदगी के बाद भी" अगदी तसंच, असं नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.