Kalyan Political News : कल्याणच्या भाजप-शिवसेना वादावर अखेर पडदा; आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत...

Lok Sabha Election 2024 : बैठकीत नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. यानंतर कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याच कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले आहे.
Kalyan Political News
Kalyan Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Kalyan News : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या कार्यकत्यांनी घेतली होती. यामुळे महायुतीत मोठा तणाव दिसून आले होते. अखेर आज या वादावर पडदा पडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात भाजप वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे आता ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील अडचणी काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Elec

कल्याणमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे चित्र होते. श्रीकांत शिंदे यांनी सहकार्य करणार नसल्याची भूमिकाही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली होती. दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात याबाबत कार्यकत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर याचा फटका नको म्हणून भाजपच्या वरिष्ठांनी यावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kalyan Political News
Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, गणपत गायकवाड काय भूमिका घेणार?

याबाबत आज सकाळी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या निवासस्थानी कल्याण पूर्वेतील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकरत्यांची बैठक झाली. या बैठकीत नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. यानंतर कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याच कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले आहे.

Kalyan Political News
BJP Politics: कोल्हेंची नाराजी कधी दूर होणार? विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचं टाळलं!

"कल्याणची (Kalyan) जागा भाजपला मिळावी अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांची होती. ही मागणी काही गैर नव्हती. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. कार्यकर्त्यांची समजूत घालण्याती आली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार असणारे श्रीकांत शिंदे यांनाच बहुमतांनी निवडून आणून मोदींचे हात बळकट करुया," असे नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com