Thane MNS Politics News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांची मोर्चेबांधणी व प्रचारास सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका जाहीर करणार आहेत.
त्या अगोदर कल्याण ग्रामीण व डोंबिवलीत रविवारी मनसे(MNS)च्यावतीने नवचैतन्य वाहन रॅली काढत एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले गेले. मनसेचे हे शक्तिप्रदर्शन नेमके काय दर्शवते ? कल्याण लोकसभेत उमेदवार देणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहॆ.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये नवचैतन्य रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. सदर रॅलीत मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा या जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत आहे. नवचैतन्य बाईक रॅलीतून एक प्रकारे कल्याण लोकसभेत मनसे तर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह पाहता पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आपली भूमिका मांडताना लोकसभा निवडणूक लढवणे व उमेदवारांची घोषणा करणार का ? कल्याण च्या जागेवर मनसे दावा करणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार आहे. परंतु यंदाच्या मेळाव्याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यामधून मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे.
मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची महायुतीशी वाढलेली जवळीक आणि विशेष म्हणजे दिल्ली दौरा करून गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतली, या घडामोडी पाहता राज ठाकरे नेमका काय निर्णय जाहीर करतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.