MLA Raju Patil On BJP: 'भाजपचं काय दुखतंय, अमित ठाकरेंचं बोलणं खुपतंय'; आमदार राजू पाटील मैदानात

MNS MLA Raju Patil News: आमदार राजू पाटलांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले
MNS MLA Raju Patil
MNS MLA Raju PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंना 'टोलफोड' घटनेवरून भाजप नेत्यांनी चांगलेच घेरले असून या घटनेत मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यापाठोपाठ टोल नाक्याच्या तोडफोडीवरून अमित यांना भाजप नेते उपदेशाचे डोस देत आहेत. पण भाजपचा हा डोस 'ओव्हर' होऊ लागल्याने मनसे नेतेही भाजपला जशास तसे उत्तर देऊन परतफेड करू लागले आहेत.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंपाठोपाठ आमदार राजू पाटलांनीही भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे. "भाजपचे काय दुखतेय, अमित ठाकरे जे बोलले ते त्यांना खुपले आहे", असे सांगून पाटलांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर आघात केला.

रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून अमित ठाकरेंनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधत "सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती", अशी टिप्पणी केली होती.

यानंतर भाजप नेते गिरीश महाजनांनी अमित यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत अमित ठाकरेंचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचे सांगून त्यांच्यावर पलटवार केला होता.

MNS MLA Raju Patil
Irshalwadi Landslide: ...तर इर्शाळवाडीची दुर्घटना टाळता आली असती; अमित ठाकरेंनी राज्य सरकारला सुनावलं

अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नरच्या टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली. पण याच घटनेवरून मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत.

भाजपने ट्वीट करत मनसे कार्यकर्त्यांच्या टोलफोडीचा व्हिडिओ शेअर केला असून "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा",असा सल्ला दिला आहे.

MNS MLA Raju Patil
Sandeep Deshpande Replied BJP : थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपने मनसेला शिकवू नये; संदीप देशपांडेंनी फटकारले

यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी भाजपला चांगलेच फटकारले. मणिपूरच्या हिंसाचारावर थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपने मनसेला शिकवू नये, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटलांनीही "भाजपला काय दुखते, अमित ठाकरे जे बोलले ते त्यांना खुपले आहे", असे म्हणत भाजपला सुनावले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com