Pune News : तलाठ्यासाठी मदतनीसाने मागितली ३५ हजाराची लाच, तलाठी गोत्यात..

Pune ACB News : : नितीन ढमाले असे या मदतनिसाचे नाव आहे.
Bribe
BribeSarkarnama
Published on
Updated on

Pune ACB News : : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचे सत्र सुरुच आहे. काल (मंगळवारी) एसीबीच्या (ACB) पथकाने ३५ हजार रुपयांची लाच मागितली म्हणून एका किवळे (ता.मावळ,जि.पुणे) तलाठी कार्यालयातील मदतनिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, तलाठ्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. त्यामुळे किवळ्याचे तलाठीही गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याबाबत एसीबीने फिर्य़ाद दिली आहे. नितीन ढमाले असे या मदतनिसाचे नाव आहे.

Bribe
Congress : अंतर्गत कुरबुरी तर सर्वच पक्षांमध्ये असतात, लवकरच निकाली निघेल ‘हा’प्रश्‍न !

नितीन ढमाले याने रावेत येथील एका ३३ वर्षाच्या तरुणाकडे त्यांच्या सोसायटीच्या जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यासाठी ही ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीचे पीआय संदीप वर्हाडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, शासकीय अधिकारी,कर्मचारी,लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे डीवायएसपी श्रीहरी पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com