मोठी बातमी : राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट ; तासभर खलबतं ?

Raj Thackeray : ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने राज्यात नवी राजकीय खेळी होणार का, या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
Raj Thackeray,devendra fadnavis
Raj Thackeray,devendra fadnavissarkarnama

मुंबई :राज्यात दीड महिन्यापूर्वी सत्तासंघर्ष झाला. तीन दिवसापूर्वी शिवसेना आणि संभाजी बिग्रेड यांची युती झाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे समोर येत असल्याचे चित्र आहे. (Raj Thackeray latest news)

आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे समजते.

ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने राज्यात नवी राजकीय खेळी होणार का, या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. येत्या 5 सप्टेंबर रोजी भाजचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही मुंबईत येणार आहेत. हे दोन्ही नेते महापालिका निवडणुकीवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या ठाकरे-फडणवीस भेटीला विशेष महत्व असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी कुणाही राजकीय व्यक्तीची भेट घेतली नव्हती. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे एक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहेत. अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार हे कशाप्रकारे नास्तिक आहेत आणि त्यांची संपूर्ण विचारसरणी आणि निर्णयप्रक्रिया त्याच अनुषंगाने आहे, असे राज ठाकरे यांनी सभेत सांगितले होते.

Raj Thackeray,devendra fadnavis
Kirit Somaiya : टि्वन टॉवर पाडल्यानंतर सरनाईकांच्या विहंग इमारतीबाबत सोमय्या म्हणाले..

राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते हे सर्व मुद्दे लोकांसमोर प्रभावीपणे मांडतात. याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com