Deshpande Vs Raut : 'संजय राऊत हे पाकिस्तान सारखे', राज ठाकरेंच्या शिलेदाराने मुळावरच घाव घातला

Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut :राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीच्या चर्चा सुरू असताना संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केले होते.

Sandeep Deshpande compares Sanjay Raut to Pakistan, escalating the political tension in Maharashtra.
Sandeep Deshpande compares Sanjay Raut to Pakistan, escalating the political tension in Maharashtra. sarkarnama
Published on
Updated on

Sandeep Deshpande News : संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची चर्चा होते आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी अमित शाह,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी धक्कादायक दावे केले आहेत. नुकतेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अटक झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची घरी फोन करून तरी विचारायला हवे होते, असे म्हटले होते.

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि व्हिक्टीम कार्ड खेळायचं. अरे तुम्ही काय स्वातंत्र सैनिक म्हणून जेल मध्ये नव्हता गेलात आर्थिक घोटाळ्याच्या आरोपा खाली गेला होतात, असे देशपांडे यांनी ट्विट केले आहे.


Sandeep Deshpande compares Sanjay Raut to Pakistan, escalating the political tension in Maharashtra.
Ashadhi Palkhi Wari : पालखी मार्गावरील तीन जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; आषाढी वारीपूर्वी अनुदान देणार : गोरेंची घोषणा

मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युतीविषयी चर्चा सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामध्ये राज ठाकरेंनी युती आघाडीच्या भरोवशावर राहू नका. निवडणुकीच्या कामाला लागा युती आघाडीचे मी पाहून घेईन असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युती लांबणीवर पडल्याची शक्यता आहे त्यात संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

संदीप देशपांडेंचा युतीला विरोध?

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीच्या चर्चा सुरू असताना संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे मनसेतील काही नेत्यांचा या युतीला विरोध असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर राज ठाकरेंनी कोणीही या युतीबाबत बोलू नये अशा सूचना दिल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपले मत व्यक्त केले नव्हते.

नरकातील राऊत असे नाव ठेवा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की राऊत यांनी पुस्तक लिहिले आहे नरकातील स्वर्ग पण मी त्यांना पत्र लिहून सांगणार आहे की त्यांनी पुस्तकाचे नाव बदलून 'नरकातील राऊत' असे करावे.


Sandeep Deshpande compares Sanjay Raut to Pakistan, escalating the political tension in Maharashtra.
Farmers Loan : साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 248 शेतकरी सरकारला भिडले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com