“संजय”ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेचा टोमणा

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी संजय राऊत (sanjay raut) यांची खिल्ली उडवली आहे.
sandeep deshpande, sanjay raut
sandeep deshpande, sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसेनवर टीकास्त्र सोडलं आहे.

या निर्णयावर मनसेने टीका करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी संजय राऊत (sanjay raut) यांची खिल्ली उडवली आहे. देशपांडे यांनी टि्वट करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अग्रलेख 'सामना'तून (ऑनलाईन) का हटविला, असा सवाल राऊतांना केला आहे. संदीप देशपांडे यांनी "भाजप के पाप गिनवानेसे शिवसेने के पाप कम नही होते" असा शिवसेनेला टोला लगावला आहे. (Sandeep Deshpande Slams Sanjay Raut)

राज्य सरकारने वाईन सुपरमार्केटमध्ये विक्री करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी दिल्यावर शिवसेना खासदार राऊत समर्थन करताना दिसत आहेत. यावरुन संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.

“कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला राज ठाकरेंवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय”ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?” असे टि्वट देशपाडेंनी केले आहे.

sandeep deshpande, sanjay raut
ठाकरे सरकार रोज गांधींची हत्या करतयं ; भाजपचा हल्लाबोल

कोरोना काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारचा महसूल बुडत असल्यामुळे वाईन शॉप सुरु करण्याची मागणी केली होती. तेव्हा राज ठाकरेंवर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला होता. परंतु आता राज्य सरकारने वाईन विक्रीची परवानगी दिल्यावर संजय राऊत समर्थन करत आहेत. यावरुन संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

sandeep deshpande, sanjay raut
उत्तरप्रदेशात नात्यांमध्येच टफ फाईट ; भाऊ-बहीण, सासरा-सून मैदानात

राज ठाकरेंच्या सूचनेचा खिल्ली उडवत "सामना"तून राऊतांनी 'फाईन,डाईन, वाईन..वा राज बाबू,' असा अग्रलेख लिहून टीका केली होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने देशपाडेंनी राऊत यांना लक्ष केले आहे. सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे का? असा प्रश्न विचारत 'सामना'मध्ये त्यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका करणार अग्रलेख 'सामना'च्या वेबसाईट वरून ऑनलाईन का काढण्यात आला, असा सवाल देशपांडेंनी केला आहे. कंपन्यांचे शेयर घेतले म्हणून सुबुद्धी सुचली का? अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com