MNS Politicas News : हिंदुत्वाचा विचार करून पाठिंबा दिला आहे. हे धर्मयुद्ध आहे, राज ठाकरे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत. श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी कोण कोण गेले होते आणि कुणाला पाठिंबा दिला. धर्म नीतीला लक्षात घेऊन त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी ठाण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
याचदरम्यान महायुतीचा प्रचार करायचा की नाही. याबाबत निर्णय झालेला नाही. तसेच तो राज ठाकरे निर्णय घेणार आहेत आणि महायुतीने आम्हाला सन्मानपूर्वक बोलवले तर आम्ही जाऊच असे उद्गार काढत त्यांनी विधानसभा निवडणुकीत मनसे(MNS) हा फार मोठा पक्ष म्हणून उभा राहील. असाही विश्वास यावेळी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाण्यातील मनसे पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन यांनी वरील विश्वास व्यक्त केला. तसे, कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला, त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) काय करणार? मतं वेगळी असली तरी पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत ती असावीत अस मला वाटतं नाही. राजीनामे दिलेले कार्यकर्ते हे तितके प्रभावी नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी निर्णय विचारपूर्वक, हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन घेतलेला आहे. राज ठाकरे आधुनिक युगातील कर्ण आहेत, त्यांनी आधुनिक हिंदुत्वाची शाल पांघरून मदतीला आलेल्यांना मदत दिली आहे. त्यांना माहिती होते, टीका करणारे कोण आहेत. तसेच राज ठाकरे मोदींना पाठिंबा देणार नाहीत. पाठिंबा दिल्यावर टीका सुरू झाली. मग महत्व नव्हते, तर ते कुठे गेले तरी तुम्ही का चिंता करता. असा टोलाही प्रकाश महाजन(Prakash Mahajan) यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
या देशाचं हीत महत्त्वाचं आहे आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे आहे. हा सगळा विचार करून राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. तसेच राज ठाकरे हे कुठे गेले याची चिंता बाकीचे का करतात. कर्णाची कवचकुंडले मागायला इंद्र येणार ते त्यांना माहिती होतं. मात्र काही लोकांनी शाल पांघरून हिंदुत्वाचे ढोंग घेतले आहे. असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या भूमिका बदलाबाबत विचारले असता, महाजन यांनी काही भूमिका सतत बदलत असतात. मात्र आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीही कधीच बदलली नाही. तसेच फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नाते जोडत नाही. अपेक्षा कोणतीही ठेवली नाही. त्यामुळे आम्ही सगळे तणावमुक्त आहोत. असेही ते म्हणाले.
हिंदुत्वाशी आमची नाळ जुळलेली आहे. ही भूमिका देशहित डोळ्यासमोर ठेवून घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाला धरून आहेत. पण, अजित पवार यांच्यात बदल झालेला आहे. म्हणून त्यांनी हिंदुत्वाला पाठिंबा दिलेला आहे. असेही ते म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.