प्रकाश लिमये
MNS aggressive stand on Marathi issue : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठीचा वाद रंगला होता. भाजपने मराठीच महापौर होणार हे स्पष्ट केले आहे. मात्र, मीरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर होणार की नाही यावर संभ्रम आहे.
मीरा रोडमध्ये काही महिन्यांपूर्वी निर्माण झालेल्या मराठी अमराठी वाद अजूनही शमलेला नाही महापौर पदाच्या निवडणुकीनिमित्त पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झाला आहे. मिरा भाईंदरचा महापौर मराठीच झाला पाहिजे या विषयावर मनसे व मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे.
मीरा रोडला मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यापाठोपाठ भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय व्हायला हवा असे मत काही दिवासांपूर्वी व्यक्त केले होते. त्याच्यावरून गदारोळ झाला होता. तेव्हापासून मराठी अमराठी वादाला शहरात नव्याने सुरुवात झाली.
आता महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या मुद्द्याने जोर धरला आहे. महापौर निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण गुरुवारी (ता.२२) जाहीर झाल्यानंतरच भाजपचा उमेदवार नक्की होणार आहे. मात्र त्या आधीच मिरा भाईंदरचा महापौर मराठीच असला पाहिजे अशी ठाम भूमिका मराठी एकीकरण समिती व मनसेने घेतली आहे.
समितीने थेट मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. मिरा भाईंदर मध्ये भाजपची सत्ता स्थापन होत आहे. या प्रक्रियेत मराठी माणसाचा मान, मराठी भाषेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे. मिरा भाईंदरमध्ये स्थलांतरित झालेल्या अन्य भाषिकांचा आम्ही सन्मान करतो.
मात्र याठिकाणी अमराठी महापौर झाल्यास सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरा भाईंदराच्या आगामी महापौर मराठी व्हावा या समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा समितीच्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
मनसेने देखील मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी बुधवारी (ता.२१) मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालय येथे आंदोलन झाले. मीरा रोड येथील मराठी अमराठी वादावर मनसेचे आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंनी देखील सभा घेत त्यावेळी इशारा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.