मनसे विद्यार्थी सेनेच्या विभागीय अध्यक्षावर चाकूने हल्ला...

MNS : तू मला जिथे भेटशील तिथे मी तुला ठार मारीन...
MNS, Crime News Kalyan
MNS, Crime News Kalyan Sarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण मोहने येथील विकासक आणि मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष अमित कोट यांच्यावर चौघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता.१२ सप्टेंबर) दुपारी घडली. कोट हे मित्राच्या मुलीचे अॅडमिशन घेण्यासाठी बिर्ला कॉलेज येथे जात असताना बंदरपाडा परिसरात हा हल्ला झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अश्विन जोगदंड (वय 35), संदीप डोलारे (वय 34) यांसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी कोट यांना बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. (MNS, Crime News Kalyan)

MNS, Crime News Kalyan
'वेदांता' प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला; अजितदादांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मोहने आंबिवली परिसरात अमित कोट (वय 29) हे राहण्यास असून ते मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष तसेच बांधकाम व्यावसायिक आहेत. सोमवारी दुपारी ते आपला मित्र गोरख येवले यांच्या सोबत बिर्ला महाविद्यालयात गोरख यांच्या मुलीला अकरावीत प्रवेश घेण्यासाठी जात होते. बंदररोड परिसरातून जात असताना अश्विन, संदीप व त्यांच्यासह असलेल्या दोघांनी अमित यांच्या कारला आडवे येऊन त्यांची कार थांबवित त्यांच्याशी गाडीला ओव्हरटेक का केले यावरुन वाद घातला. अमित हे कारमधून बाहेर येत त्यांना काय झाले, अशी विचारणा करताच संदीप याने अमित यांचे हात पकडले व अश्विन याने अमितला शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्विन याने अमित यांच्या छातीवर चाकूने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. तू मला जिथे भेटशील तिथे मी तुला ठार मारीन, अशी धमकी दिली. आजूबाजूला लोक जमा झाल्याने चौघांनी तेथून पळ काढला होता.

MNS, Crime News Kalyan
1. 54 लाख कोटींची प्रकल्प गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय

याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अमित यांच्या तक्रारीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अमित हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. तर आरोपी अश्विन हे शिवसेनेतील शिंदे समर्थक गटातील असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com