MNS Politics : 'तो फेरीवाला... कानाखाली आवाज काढू', भाजप नेत्याला मनसेचा इशारा

Amey khopkar warning kripashankar singh : राज्यात सगळीकडे धुळवडीचा उत्साह आहे. सगळे मज्जा करताय. कशाला उगीच गलिच्छ राजकारण करायचं?, असा सवाल देखील करत अमेय खोपकर यांनी केला.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

Amey khopkar News : राज ठाकरेंना आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात, अशी टीका भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले.

'राज ठाकरेसाहेंबावर टीका करायची तुमची लायकी नाही. जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल', असे थेट इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला.

'राज ठाकरेसाहेब म्हणतात त्या प्रमाणे कृपाशंकर सिंह हा फेरीवाला आहे. तो आज एका पक्षात उद्या दुसऱ्या पक्षात. राजसाहेबांना इशारा देण्याइतका तो मोठा नाही. त्याची पात्रताही नाहीये.', असा टोला खोपकर यांनी लगावला.

raj thackeray
Defense secrets leaked : पाकिस्तान एजंट 'नेहा'च्या जाळ्यात अडकला, देशाची संवेदनशील माहिती देऊन बसला; शस्त्रनिर्मिती कारखान्यातील विभागप्रमुखाला अटक

'राज्यात सगळीकडे धुळवडीचा उत्साह आहे. सगळे मज्जा करताय. कशाला उगीच गलिच्छ राजकारण करायचं?', असा सवाल देखील करत अमेय खोपकर यांनी केला तसेच वैयक्तिक टीका राज ठाकरेसाहेबांवर कोणी करत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढू असा इशारा देखील दिला,

कृपाशंकर सिंह नेमके काय म्हणाले?

'राज ठाकरे काही जरी बोलले तर समजेल की त्यांना वेड लागले आहे. त्याला कधी कळलेच नाही की आज काय बोलले आणि उद्या काय बोलले. मला वाटते राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात. भांग घेऊन मस्त राहतात. संध्याकाळी ये माझ्या बांधवानो. माझ्या मनसैनिकांनो काहीतरी करा आणि ते काय वेगळं करतात समजत नाही. त्यांना पण भांग पाठवतो.', असे कृपाशंकर सिंह म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

raj thackeray
Karad : दक्षिणेतील उंडाळकरांच्या पक्षांतराचे उत्तरेत धक्के; 'सह्याद्री'त सत्तांतराचा भूकंप होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com